Home / Politics / सुप्रिया सुळे अजित पवार यांना राखी बांधणार का? राष्ट्रवादीच्या फूटीनंतर पहिला रक्षाबंधन

सुप्रिया सुळे अजित पवार यांना राखी बांधणार का? राष्ट्रवादीच्या फूटीनंतर पहिला रक्षाबंधन

सुप्रिया सुळे अजित पवार यांना राखी बांधणार का

आज पवार कुटुंबातील रक्षाबंधनाच्या सणावर सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर हा सण पहिल्यांदा साजरा होतोय. खासदार सुप्रिया सुळे यांनी दिंडोरीचे राष्ट्रवादीचे खासदार भास्कर भगरे यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केले. सुप्रिया सुळे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत, जिथे त्या पक्षाच्या महिला मेळाव्यात सहभागी होणार आहेत.

Read Also – बाप रे ! अरविंद केजरीवालांच्या पत्नी आणि शरद पवार, नेमकं काय घडलं त्या खोलीत

गेल्या वर्षी पवार कुटुंबीयांनी एकत्रित रक्षाबंधन साजरा केला होता, त्यामुळे यावर्षी अजित पवार यांना सुप्रिया सुळे राखी बांधतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंबातील संबंध कसे आहेत यावर सगळ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे.


Tags: ,
Scroll to Top