आळंदी येथील एका अनाथ मुलांच्या निवासी संस्थेत घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, १२ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका कर्मचार्यावर ठेवण्यात आला आहे. ही घटना १७ ऑगस्ट रोजी पहाटे घडली. आरोपी व्यंकटेश काशिनाथ माळनूर याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
आरोपी संस्थेत देखरेख करणाऱ्या कामासाठी होता, आणि पीडित मुलगा अनाथ असल्यामुळे तेथे राहत होता. घटनेच्या दिवशी, पहाटे ५ वाजता आरोपीने मुलाला उठवून टीव्ही रूममध्ये नेले आणि त्याच्यावर अत्याचार केला. घटनेनंतर मुलगा पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात गेला, ज्यामुळे ही घटना उघडकीस आली. यानंतर आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
Read Also – महिलांना केलं अजित पवारांनी खुश, जुन्नरमधील जनसन्मान यात्रेत नेमकं काय घडलं?
या घटनेने संस्थेतील इतर मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे, कारण या परिसरात यापूर्वीही अशा प्रकारच्या काही घटना घडल्या होत्या. पोलीस तपास करत आहेत, आणि पोलिस उपायुक्त शिवाजी पवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.