Pune: पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात अल्पवयीन मुलीवर चौघांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (pune college rape case) आरोपींची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून, विशेषतः इन्स्टाग्रामवर झाली होती. यानंतर त्यांनी महाविद्यालयाच्या स्वच्छतागृहात मुलीवर अत्याचार केला. या प्रकरणात चारही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यामध्ये दोन आरोपी प्रौढ आहेत आणि दोन अल्पवयीन आहेत.
पोलिसांनी या प्रकरणात IT कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे, कारण या घटनेचे काही व्हिडिओ तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे.
राज्यभरात महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासन आणि पोलीस विविध उपक्रम राबवत असताना, या घटनेने शहरात खळबळ माजवली आहे.