पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव देण्याची मागणी केली आहे. त्यांनी याबाबतचा प्रस्ताव सुद्धा दिला असून, या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. राज्य सरकार या प्रस्तावावर सकारात्मक विचार करत असून, लवकरच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला गेला, तर पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव संत तुकाराम महाराज विमानतळ म्हणून ओळखले जाईल, अशी शक्यता आहे.
Read Also – पुण्यात पोलिसांवरच कोयता गॅंगचा हल्ला: सहाय्यक निरीक्षक गायकवाड गंभीर जखमी