Ajit Pawar inaugurated the new flyover on Sinhagad Road

पुणे : सिंहगड रोडवरील नवीन उड्डाणपुलाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले

पुण्यातील सिंहगड रोडवरील राजाराम ब्रिज चौकातील नवीन उड्डाणपुलाच्या उद्घाटनप्रसंगी अजित पवार बोलत होते . खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते.

अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले की, राज्य सरकारच्या विकासकामांसाठी केंद्र सरकारकडून निधी आणण्याचे काम सुरू आहे. राज्यात रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचे जाळे निर्माण होत असल्याचेही ते म्हणाले.

सिंहगड रोडवरील नाट्यगृहाचे काम प्रगतीपथावर असून येत्या वर्षभरात ते पूर्ण करण्यासाठी 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पुण्यातील वाढत्या लोकसंख्येमुळे पायाभूत सुविधांच्या समस्या निर्माण होत असून त्या सोडविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – अजित पवारांची पुणे महापालिका आयुक्तांना फोन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेंतर्गत 35 लाख महिलांना लाभ देण्यात आला असून येत्या दोन दिवसांत 50 लाख महिलांच्या खात्यात लाभ जमा करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार माधुरी मिसाळ यांनी सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याचे सांगून भविष्यात मेट्रोच्या पिलरचे कामही करण्यात येणार असल्याचे नमूद केले.

उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांच्या इंधनाची व वेळेची बचत होणार असल्याचे डॉ.राजेंद्र भोसले यांनी सांगितले. पुलाचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.


Tags: , ,
Scroll to Top
Budget 2024 impacts on mutual funds, three categories of taxation OnePlus Nord CE 4 Lite Quick Review
Budget 2024 impacts on mutual funds, three categories of taxation OnePlus Nord CE 4 Lite Quick Review