कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील राजापूर वाडी गावात मोठ्या प्रमाणात मगरी आढळून आल्या आहेत .
कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानंतर शेतात मगरी शिरल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाण्याची पातळी कमी झाल्याने काही ठिकाणी मगरींचे दर्शन झाले आहे. या परिस्थितीमुळे स्थानिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.