आज आपण “कोहळा बांधण्याची पद्धत” आणि त्याचे फायदे जाणून घेणार आहोत. आपल्यापैकी काहींना माहित असेल की कोहळा बांधण्याची पद्धत जुनी आहे आणि त्याचे महत्त्व आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी मानले जाते. कोहळा घराच्या मुख्य दरवाजावर बांधला जातो, ज्यामुळे घराला दुष्ट शक्तींपासून संरक्षण मिळते आणि कोणाच्याही वाईट नजरेपासून घर सुरक्षित राहते.
कोहळा का बांधावा?
कोहळा बांधल्याने घरातील लोकांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभते, असा विश्वास आहे. तो घराच्या बाहेर बांधला जातो, कारण यामुळे दुष्ट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाहीत आणि नजर दोषापासून रक्षण होते.
कोहळा बांधण्याची पद्धत:
- कोहळा आणताना: कोहळा घरात आणताना तो स्वच्छ पाण्याने धुवावा आणि स्वच्छ कपड्याने पुसावा.
- पूजा: कोहळ्यावर दोन्ही बाजूंना ओम आणि स्वस्तिक चिन्ह काढून त्याची पूजा करावी. गंध, अक्षता, हळद-कुंकू, आणि फुलांनी त्याची पूजा करावी.
- काजळ रेष: कोहळ्यावर काजळाने एक रेष ओढावी, जी दुष्ट शक्तींपासून रक्षण करते.
- मुख्य दरवाज्यावर बांधणे: हा कोहळा लाल वस्त्रात बांधून मुख्य दरवाज्यावर लटकवावा, जेणेकरून तो सर्वांना दिसेल.
- सण किंवा विशेष दिवस: कोहळा शक्यतो शनिवारी किंवा अमावस्येला बदलावा.
Read Also – “या” रंगाच्या राख्या बांधा, सौभाग्य लाभेल, राशीच्या रंगानुसार राखी
महत्वाचे टिप्स:
- कोहळा सूर्यास्तानंतरच बांधावा.
- जर लाल वस्त्रात बांधलेला कोहळा लवकर खराब झाला, तर ते दुष्ट शक्तींच्या नष्ट होण्याचे चिन्ह मानले जाते.
कोहळा बांधण्याची ही पद्धत आपल्या संस्कृतीतून आलेली आहे आणि तिच्यामध्ये घराचे रक्षण करण्याची शक्ती आहे, असा विश्वास आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद!
धन्यवाद 🙏, आम्हाला कोहळा बद्दल संपूर्ण माहिती दिल्या बद्दल.