दौंड तालुक्यातील भानगावजवळील टेस्टी बाईट या खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपनीत गॅस गळती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . या घटनेत 14 कामगारांना श्वास घेण्यास त्रास, उलट्या, चक्कर येणे, डोळ्यांची जळजळ होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या कामगारांमध्ये नऊ महिलांचा समावेश असून, तिघांना गंभीर समस्यांमुळे पुण्यातील रुग्णालयात हलवावे लागले आहे.