Pune: महाराष्ट्रातील भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाचे काही पदाधिकारी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलीन होण्याच्या तयारीत आहेत. या विलिनीकरणाची प्रक्रिया ६ ऑक्टोबरला पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत होणार आहे.
बीआरएसने राज्यात लाँचिंगच्या वेळी पंढरपूर येथे मोठा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये गाड्यांचा ताफाही आणला गेला होता. मात्र, आता बीआरएसचे पदाधिकारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन होत असल्याने महाराष्ट्रातील बीआरएस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे नवे राजकीय भविष्य निश्चित होताना दिसत आहे.