पुण्यातील पूरस्थितीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण करणारी बातमी समोर आली आहे. शहरात एका दिवसात डेंग्यूचे सात नवे रुग्ण आढळून आले असून त्यात सहा गरोदर महिलांचा समावेश आहे.
पूरग्रस्त भागात चार रुग्ण आढळले असून त्यापैकी तीन महिला गर्भवती आहेत. तसेच खराडी परिसरात तीन गरोदर महिलांना डेंग्यूची लागण झाली आहे. यामुळे पुण्यातील आरोग्य व्यवस्थेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले असून, नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.